संस्थेविषयी माहिती

ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली

  1. Home
  2. संस्थेविषयी
  3. संस्थेविषयी माहिती

पतसंस्था म्हणजे भागधारक, ठेवीदार, कर्जदार, समाजातील वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, वैयक्तिक अपघातादी अडचणीतील व्यक्ती, शिपाई, वॉचमन पासून सर व्यवस्थापक पदावरील सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट अशा अनेकांचे जबाबदारीपूर्वक कामातून व सहकार्यातून उभी राहिलेली व सहकारी तत्त्वावर चालणारी आर्थिक संस्था असेच म्हणावे लागेल.

 

'ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था' स्थापनेपासून या सर्वांचे हित संवर्धन करणारी म्हणजेच हितवर्धिनी पतसंस्था असून सहकार समृद्धी विश्वास यातून प्रगतीची अखंड झेप घेणारी संस्था ठरली आहे

प्रगतीचा चढता आलेख

आर्थिक संस्था म्हणजे नफा, वेगवेगळ्या प्रकारचे रेशो, कर्मचाऱ्या मागे होणारे सरासरी काम, अशा अनेक डोक्यावरून जाणाऱ्या गोष्टी आणि जोडीचा गुण तक्ता व त्या आधारे पतसंस्थेची कामगिरी हे सगळे ऑडिटरचे झंजाळाशी सर्वसामान्य ग्राहकाला फारसे देणे घेणे नसते.

आमचे पैसे सुरक्षित आहेत ना, व्याजदर काय आहे आणि जास्तीत जास्त ऑडिट वर्ग कोणता एवढेच पुरेसे असते. पण आपली पतसंस्था आता लहान राहिलेली नाही. संपूर्ण कोकण विभाग हे कार्यक्षेत्र झाले आहे. आठ शाखा झालेल्या या सर्वांचा विचार करता थोडक्यात प्रगतीचा आढावा घेणे योग्य ठरेल,

  1. पतसंस्थेने सातत्याने अर्थात प्रथम वर्षापासून ऑडिट वर्ग अ प्राप्त केला आहे.
  2. संस्थेच्या ठेवी सतत वाढत असून आज 167 कोटींचे वर ठेवी असणे हे ठेवीदारांचा विश्वास असल्याचे द्योतक आहे.
  3. प्रतिवर्षी कर्ज वाटपातही वाढ होऊन आता 137 कोटींचे येणे कर्ज आहे.
  4. भागधारकांना सुरुवातीचे वर्षापासून लाभांश दिला असून गेली 33 वर्षे सातत्याने 15% लाभांश देणारे कोकण विभागातील एकमेव पतसंस्था आहे.
  5. निरनिराळी तरतुदींचे माध्यमातून पतसंस्था स्व-निधी उभा करून स्थैर्य प्राप्त करीत असते आता आपल्या पतसंस्थेचा स्वनिधी 30 कोटी झाला आहे.
  6. प्रतिवर्षी गुंतवणुकी वाढ होणे अपेक्षित असते त्याप्रमाणे आपली गुंतवणूक 64 कोटींचे वर आहे व ती सर्व गुंतवणूक सुरक्षित आहे.
  7. सभासद संख्या वाढ खेळत्या भांडवलात वाढ भाग भांडवलात वाढ असे सर्व मुद्दे पाहता आपणही त्यात कोठेही मागे नाही, हे नमूद करावेसे वाटते.

सामाजिक बांधिलकी

संस्थेने स्वतःचे कार्यात जशी उल्लेखनीय प्रगती केली, तसेच सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून धर्मादाय फंड, वार्षिक नफा यांचे माध्यमातून अनेक संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यामध्ये संस्कृत पाठशाळा, वेदपाठशाळा, विद्यार्थी कल्याण आश्रम, नागालँड विद्यार्थिनी वसतिगृह, पूज्य गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प, वाचनालय व श्रीराम व बलवर्धक मंडळ अशा अनेक संस्था आहेत. पूरग्रस्त इत्यादी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी मदत, उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव, गुणवंतांचा सत्कार असे अनेक कार्यक्रम पतसंस्थेने वेळोवेळी केले असून अधिक छायाचित्रातून आपल्या निदर्शनास येतीलच.

त्याचबरोबर पतसंस्थेने राज्यस्तरीय अहवाल स्पर्धा प्रथम क्रमांक असे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत त्याची यादीही आपण पाहणार आहोतच

सर्व हितार्थाय

 

ठेवीदारांना शक्यतो जास्त व्याजकर्जदारांना कमीत कमी व्याज याकडे पतसंस्थेने बॅलन्स राखून काम करत सर्व सभासदांचे हेच जोपासले आहे. लाभांश 15% देऊन भागधारकांना सांभाळले आहे. सर्व सभासदांना अपघात विमा संरक्षण, तसेच कर्जदारांना कर्जाचे प्रमाणात अपघात विमा संरक्षण दिले आहे.

कर्मचारी हे पतसंस्थेचे आधारस्तंभ त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यास पतसंस्थेचे प्राधान्य असते. त्याप्रमाणे पगारवाढ, बोनस याकडे त्या दृष्टीने पाहिले जाते कर्मचारी वृंदामध्ये एक कुटुंबाची भावना रहावी यासाठी संचालक मंडळ काळजी घेत असते. त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी दूर करण्यासही सहाय्य केले जाते. प्रत्येक कर्मचारी हा ज्ञान संपन्न म्हणजे सर्व गोष्टींची पूर्ण माहिती असलेला, नवीन झालेले बदल समजून घेणारा असावा यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली जाते. कर्मचारी व ग्राहक हे संबंध ही तितकेच आपुलकीचे राहावे यासाठीही त्यांना मार्गदर्शन होते. अर्थातच मैत्र जीवाचे हा भाव प्रत्येक वेळी मनात ठेवून काम केले की हे आपोआपच घडत असते.

जे ठेवीदार व सभासद वयोवृद्ध आहे पतसंस्थेत येऊ शकत नाही त्यांना कर्मचारी त्यांचे घरी जाऊन सेवा देतात, अर्थात कोणताही मोबदला न घेता. हेही सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून केले जाते.

पतसंस्थेच्या नावावर ब्राह्मण हितवर्धिनी असा उल्लेख असला तरी सहकार कायद्याप्रमाणे सर्व सारखेच असतात या भावनेने जाती-धर्माचा विचार न करता सर्वांचे हित पाहणारी पतसंस्था म्हणूनच आपला नावलौकिक आहे. कर्ज व्यवहारातही लहान-मोठा भाव न ठेवता गरजेप्रमाणे व प्रामाणिकपणाचे कशावर कर्ज मंजुरी केली जाते. कर्जदाराला कमीत कमी त्रास होईल यासाठी सुरुवातीलाच आवश्यक कागदपत्रांची व इतर गोष्टींची कल्पना त्यांना दिली जाते. त्यामुळे  ‘खेटे घालणे’  हा प्रकार होत नाही व आत्मीयतेची भावना टिकून राहते.

अशाप्रकारे जी व्यक्ती आपल्या संपर्कात येईल ती आपली म्हणजे आपल्या पतसंस्था कुटुंबातील एक कशी होईल याकडे लक्ष देऊन काम केल्याने आज पतसंस्था नावावर रूपाला आलेली व उत्कर्षाची झेप घेत राहणारी पतसंस्था ठरली आहे.