संस्थेविषयी
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोगत
- Home
- संस्थेविषयी
- मुख्य कार्यकारी अधिकारी मनोगत
1992 साली दोन लाख 19 हजार वसूल विभाग भांडवल व आठ कोटी 85 लाखाच्या ठेवी घेऊन पतसंस्थेची सुरुवात एका छोट्या खोलीतून झाली. आज पतसंस्थेच्या तीन शाखा स्ववास्तुत कार्यरत आहेत. पतसंस्थेचे मुख्य कार्यालय दोन मजली इमारतीमध्ये कार्यरत आहे. या सर्वांसाठी पतसंस्थेच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांनी व अर्थातच सभासदांनी अथक प्रयत्न व मेहनत केलेली आहे, हे वेगळे सांगणे नलगे. 1992 मध्ये सुरू झालेल्या पतसंस्थेची, पहिली गुहागर शाखा 2006 मध्ये सुरू झाली. आज पतसंस्थेच्या एकूण आठ शाखा व स्वतंत्र मुख्यालय आहे. पतसंस्थेने सभासद अपघात विमा, लॉकरसुविधा, कर्जदार अपघात विमा इ. काळानुरूप सभासदांच्या गरजा घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. परंतु जसा काळ बदलत गेला तसतसे पतसंस्थेचे स्वरूपही अवाढव्य होत गेले. स्टोरेजसाठी पतसंस्थेने 2017 मध्ये हजार स्क्वेअर फुटाचे स्वतंत्र स्टोररूम घेतले. याचबरोबर लॉकर ची गरज भागविण्यासाठी, स्वतंत्र लोकर रूम व्यवस्था सुरू केली. काळानुरूप येणारे बदल जसे की संगणकीकरण, दर्जेदार बैठक व्यवस्था, उत्तम फर्निचर, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आता याचबरोबर चहा कॉफीचे वेल्डिंग मशीनही पतसंस्थेकडे आहे.
कोणत्याही परिपत्रकाची किंवा सरकारी आदेशाची पायमल्ली न करता ती आपत्ती न समजता इष्टापत्ती समजून पतसंस्थेने दरवेळेलाच याचां चांगल्या प्रकारे उपयोग करून आपली आर्थिक गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला. सी आर आर/ एस एल आर ची स्वतंत्र गुंतवणूक ही पतसंस्थेने सुरू केली. लोकमुद्रा पतसंस्था लोटे चे अधिग्रहण करून आपली कार्यक्षमता व शाखा विस्तारही केला. आज पतसंस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून कोअर बँकिंग सिस्टीम मध्ये कार्यरत आहेत.
पतसंस्थेच्या विविध निधीमधून कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक मदत, आरोग्य सुविधांसाठी आर्थिक मदत, वसतिगृहांसाठी, वाचनालय, क्रीडा स्पर्धा, वेदपाठशाळा, नागा विद्यार्थिनी छत्रावास, बलवर्धक मंडळ, व्यायाम शाळा यांनाही पतसंस्थेने आर्थिक मदत केलेली आहे. समाजाचा आर्थिक वैचारिक स्तर वाढविण्यासाठी पतसंस्थेने स्वतंत्र “वसंत व्याख्यानमाला” हा निधी सुरू करून अनेक उत्तम व्यक्तींची व्याख्यानेही ठेवली. यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर टिळक, ऍडव्होकेट नितीन माधव आपटे, अर्थतज्ञ अनिल बोकील, वृत्तांकन कार विश्वास मेहंदळे, यांची नावे प्रामुख्याने घेता येईल. याचबरोबर लिटिल चॅम्प शमिका भिडे, आयुष्यावर बोलू काही चे सलील खरे, त्रिवेणी कार्यक्रम सादर करते श्री विघ्नेश जोशी व सहकारी यांच्या गाण्याचा कार्यक्रम, वृक्षा रोपण यामध्ये औषधी व उपयुक्त शंभर वृक्ष लागवड पतसंस्थेने केलेले आहे व त्यांची जोपासना ही योग्य प्रकारे केलेली आहे. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांचे वाचन व सभाधिकपणा वाढविण्यासाठी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पतसंस्थेने ए.जी. हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती.
निसर्गाचा प्रकोप अर्थात फयान चक्रीवादळ व निसर्ग चक्रीवादळने कोकणभूमीला चांगलाच तडाखा दिला. सभासदांच्या नारळ पोफळीच्या आंबा काजूच्या बागा, शेती बागायती उध्वस्त झाल्या. पण यावेळीही पतसंस्थेने सभासदांना सहकार्याचा हात देऊन त्यांची आर्थिक मागणी पूर्ण करण्यावर भर दिला. कोविडमध्येही सभासदांना घरपोच सेवा देण्यात आली. तसेच वृद्ध व्यक्तींना किंवा गरजवंतांना त्यांचे दैनंदिन आवश्यक सामान औषधे इत्यादी ही घरपोच करण्यात पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले.
उद्योजक वाढविण्याच्या दृष्टीने चर्चेचे आयोजन एकत्रीकरण यासाठी ही पतसंस्थेने प्रयत्न केलेले आहेत. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा ताई महाजन, आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रेय उर्फ तात्यासाहेब नातू, राज्यस्तरीय लेखा समिती राज्यमंत्री दर्जा सचिन पटवर्धन, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष श्री शेखर चरेगावकर यांसारखे मान्यवर, तसेच श्रीलंकेचे सहकार विषयावर अभ्यासासाठी आलेले शिष्टमंडळ यांनीही पतसंस्थेच्या कामाची दखल घेऊन कौतुक केलेले आहे. पतसंस्थेने आजवर विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहे यामध्ये उत्कृष्ट अहवाल ,आर्थिक गुणवत्ता सामाजिक बांधिलकी या सर्वांचा समावेश आहे. परंतु याचबरोबर पतसंस्थेवरील विश्वास व कर्मचाऱ्यांची विनम्र आपुलकीची तत्पर सेवा ही जास्त महत्त्वाची आहे.
ज्या पतसंस्थेने समाजाचा विकास व आर्थिक उन्नती हेच ध्येय ठेवून काम केले, त्या पतसंस्थेत गेली दहा वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना खरोखरच अभिमान वाटतो. कोविड सारख्या साथीच्या काळात पतसंस्थेने गूगल मीट द्वारे आपल्या वार्षिक सभेचे आयोजन केले व त्यानंतर पतसंस्थेला तांत्रिक गोष्टींची किमया समजून पतसंस्थेने क्यू आर कोड, आरटीजीएस, एनईएफटी फॅसिलिटी व अन्य सेवा सुविधा आपल्या सभासदांना देऊ केल्या. परंतु कायद्यामुळे लिमिटेशन्स असल्यामुळे याच्यावर नंतर बंधने आली.
तरीही पतसंस्थेने वाढ व विकास हेच ध्येय कायम ठेवून आपली वाटचाल सुरू ठेवली आहे, त्याचेच उदाहरण म्हणजे आजच्या वेबसाईटचे उद्घाटन.
ध्येय असावे सुदूर की जे...
कधी ने यावे हाती...
जिवेभावे मात्र तयाच्या
प्रकाशात चालावे...
या पूर्वासुरीनी घालून दिलेल्या कर्तव्य पथावर पतसंस्था आजही मार्गक्रमण करत आहे व करत राहील
धन्यवाद
-मुख्य कार्यकारी अधिकारी
Safeguard your family with our tailored solutions
Our comprehensive approach identifies potential risks, ensuring proactive protection amidst ever-evolving challenges.
Let's get in touch
Give us a call or fill in the form below and we will contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.
- Expert help
- Proven results

Professional journey
Company achievements timeline
We are committed to being a business that balances purpose with profit that create value for all our stakeholders.
Company Inception
The company is founded by a team of passionate entrepreneurs. The vision, mission, and values are defined.
January 2020
Milestone 1
Alpha Testing
The first version of the product is completed. Alpha testing begins, with the team rigorously testing the product for functionality and usability.
February 2020
Milestone 2
User Feedback
The product enters beta testing. A select group of external users is invited to try out the product and provide feedback.
September 2020
Milestone 3
Official Launch
The product is officially launched to the public. The marketing campaigns go live, and the team focuses on driving user acquisition and adoption.
June 2021
Milestone 4
Reliable choice
A reliable choice for tailored insurance solutions
Discover the assurance of expert guidance, personalized service, and dedicated support for your insurance needs.

Expert guidance
Benefit from seasoned advice, ensuring informed decisions for optimal insurance solutions.

Personalized service
Tailored services matching your unique needs for a seamless insurance experience.

Dedicated support
Receive unwavering assistance throughout, guaranteeing your peace of mind and satisfaction.
Join our team
Looking for a great place to grow?
Apply now and become part of our innovative team dedicated to driving meaningful change in the tech industry.